S M L

नागपूरमध्ये डॉक्टर पत्नीनेच केला डॉक्टर पतीचा खून

Sachin Salve | Updated On: Nov 30, 2015 07:50 PM IST

नागपूरमध्ये डॉक्टर पत्नीनेच केला डॉक्टर पतीचा खून

30 नोव्हेंबर : नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत डॉक्टर महिलेने आपल्या पॅथोलॉजिस्ट नवर्‍याचा खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. रविकांत उके असं या मृत डॉक्टरचे नाव असून त्याची पत्नी व्यवसायाने डेंटीस्ट असलेल्या ट्विंकल उके हिला अटक करण्यात आली आहे.

घरघुती वादातून ट्विंकलने आपल्या पतीचा भाजी कापण्याच्या चाकूने खून केल्याची कबुलीही तिने दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून ट्विकल आणि रविकांत यांच्यात घरघुती कारणांवरून दररोज भांडणे होत होते. पण रविवारी वाद विकोपाल गेल्याने ट्विंकने रविकांतचा खून केला. या घटनेनंतर आरोपी ट्विकल आपल्या लहान मुलाला घेऊन फरार झाली होती. पण पोलिसांनी या घटनेचा तपास करत आरोपीला अटक केली. या प्रकरणात ट्विंकल सोबत आणखी आरोपी असण्याची शक्यता पोलिसांनी नाकारली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 30, 2015 07:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close