S M L

मोदींच्या भेटीनंतर शरीफ म्हणाले, चर्चेतून मार्ग निघतील !

Sachin Salve | Updated On: Nov 30, 2015 11:05 PM IST

मोदींच्या भेटीनंतर शरीफ म्हणाले, चर्चेतून मार्ग निघतील !

30 नोव्हेंबर : पॅरिसमध्ये जागतिक हवामान बदल परिषद सुरू आहे. या परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची भेट झाली. या दोन्ही नेत्यांनी हस्तांदोलन केलं आणि त्यांच्यात तीन मिनिटं गुफ्तगू झाली. या भेटीमुळे दोन्ही देशांमधली चर्चेची कोंडी फुटणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

मोदींशी झालेल्या भेटीनंतर शरीफ यांनी ही भेट चांगल्या वातावरणात झाली असून आम्हाला भारतासोबत चर्चा पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. चर्चेतून मार्ग निघतील अशी प्रतिक्रिया दिली. पण, मोदींसोबत झालेल्या चर्चेवर बोलण्यास शरीफ यांनी नकार दिला.

पॅरिसमध्ये या परिषदेत मोदींनी शरीफ यांची मोठ्या उत्साहाने भेट घेतली. परराष्ट्र मंत्रालयाने या भेटीचा फोटो ट्विट केलाय. दोनच दिवसांपूर्वी शरीफ यांनी शांततेच्या मुद्यावर भारतासोबत मैत्रीपूर्ण संबंध ठेवले पाहिजे असं वक्तव्य केलं होतं. आता या भेटीनंतर शरीफ यांनी सकारात्मक चर्चा झाली असं सांगितलंय. या भेटीचा भारत पाकिस्तान सीरिजच्या मुद्यावर काही परिणाम होतो का हे पाहावं लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 30, 2015 11:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close