S M L

लोकल समस्यांवर समिती होणार स्थापन

Sachin Salve | Updated On: Dec 1, 2015 08:35 AM IST

thane local4किरण सोनावणे, कल्याण

01 डिसेंबर : डोंबिवलीतला तरुण लोकल ट्रेनमधून खाली पडल्याची दखल आता रेल्वे मंत्री सुरेश प्रभूंनी घेतलीये. मुंबईतल्या लोकल प्रवाशांच्या समस्यांवर अभ्यास करण्यासाठी आता एक समिती स्थापन होणार आहे. उपनगरीय लोकल गेल्या दशकात मृत्यूचा सापळा बनली आहे. विशेषतः ठाणे ते अंबरनाथ परिसरात सर्वात जास्त लोक खाली पडून जीव गमावतात. यासंदर्भातला हा विशेष रिपोर्ट

भावेश निकाते हा डोंबिवलीतला तरुण शनिवारी सकाळी लोकलमधून पडला आणि काही तासांत हा व्हीडिओ व्हायरल झाला. वर्षाकाठी सुमारे 3000 लोक लोकल ट्रेनमुळे जीव गमावतात. पण पहिल्यांदाच मृत्यू कॅमेर्‍यात कैद झाला. याची दखल आता थेट मुंबईकर

असलेल्या रेल्वे मंत्र्यांनी घेतलीये. मुंबई लोकलचा अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन करा, असे आदेश रेल्वे मंत्री सुरेश प्रभूंनी केलीये. रेल्वे, राज्य सरकार आणि प्रवाशी संघटनांचे प्रतिनिधी या समितीत असतील. ही समिती महिन्याभरात अहवाल देईल. पण हे होण्यासाठी भावेशचा बळी जावा लागला.

एका दशकापूर्वी लोकसभेत मुंबई लोकलमधल्या गर्दीचा मुद्दा गाजला आणि त्यानंतर मध्य रेल्वे विकास महामंडळाने केवळ लोकल मधील गर्दी कमी करण्यासाठी जागतिक बँकेच्या कडून 2500 कोटी रुपयांचे कर्ज घेतलं. पण गर्दी कमी करण्यासाठी उपाययोजना का नाही झाल्या, असा सवाल प्रवाशी विचारत आहेत.

एकूण अपघातांपैकी ठाणे ते मुंबईमधलं प्रमाण 10 ते 15 टक्के आहे. पण ठाणे ते अंबरनाथमध्ये हे प्रमाण 85 ते 90 टक्के आहे. अंबरनाथच्या पुढून येणार्‍या प्रवाशांसाठी गाड्या कमी असतात, त्यामुळे त्यांना जीवावर उदार होऊन प्रवास करावा लागतो. मुंब्रा, डोंबिवली,

कल्याण आणि अंबरनाथ या भागातली लोकसंख्या झपाट्याने वाढतेय. पण त्याची दखल रेल्वे घेत नाहीये, असंच दिसतंय.

जो लोकलचा डबा फक्त 86 प्रवासांच्या प्रवासासाठी बनलेला आहे, त्यात गर्दीच्या वेळी सुमारे 200 ते 300 लोक गुरा-ढोरांसारखा प्रवास करतात. स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणार्‍या सरकारने आधी लोकांना सुरक्षित प्रवासाची सोय द्यावी, एवढीच अपेक्षा सर्वसामान्य प्रवासी करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 1, 2015 08:35 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close