S M L

चारित्र्याच्या संशयावरुन पतीने पत्नीला 8 महिने बाथरुममध्ये कोंडलं

Sachin Salve | Updated On: Dec 1, 2015 09:40 AM IST

चारित्र्याच्या संशयावरुन पतीने पत्नीला 8 महिने बाथरुममध्ये कोंडलं

01 डिसेंबर : औरंगाबादमधील मिसारवाडी भागात सारिका अग्रवाल या 19 वर्षीय विवाहितेला गेल्या आठ महिन्यांपासून बाथरुममध्ये कोंडून ठेवल्याची धक्कादायक घटना समोर आलीये. वस्तीमधील काही जागृत महिलांच्या लक्षात हा प्रकार येताच त्यांनी सारिकाची सुटका केली.

सारिकाचा नवरा संजय अग्रवाल हा केटरींगचा व्यवसाय करतो. सारिकाच्या चारित्र्यावर संशय घेवून त्यानं तीला गेल्या आठ महिन्यांपासून बाथरुममध्ये कोंडून ठेवलं होतं. सारिकाच्या नवर्‍या विरूद्ध सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. सारिकाला जेवण पाणी न देता कोंडून ठेवल्यानं ती अशक्त झालीये. सारिका अशक्त झाल्यानं तीला तातडीनं उपचारासाठी घाटी रूग्णालयात दाखल करण्यात आलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 1, 2015 09:29 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close