S M L

मंत्र्याचा ताफा अडवणार्‍या शेतकर्‍यांवर गुन्हे दाखल

Sachin Salve | Updated On: Dec 1, 2015 01:44 PM IST

मंत्र्याचा ताफा अडवणार्‍या शेतकर्‍यांवर गुन्हे दाखल

01 डिसेंबर : उस्मानाबादमध्ये पोलीस आणि महसूल प्रशासनाचा उफराटा कारभार समोर आलाय. उस्मानाबादमधल्या दुष्काळपीडित शेतकर्‍यांनाच महसूल विभागानं दणका दिलाय. शिवसेनेच्या दुष्काळ पाहणीत मंत्र्यांची गाडी अडवणार्‍या शेतकर्‍यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

गेल्या आठवड्यात सेनेचे आमदार आणि उस्मानाबादचे पालकमंत्री डॉ. दीपक सावंत जिल्ह्याच्या दौर्‍यावर होते. कळंब तालुक्यातल्या हांवरगावात संतापलेल्या शेतकर्‍यांनी सावंतांचा ताफा अडवला. अगोदर मदत करा नंतर पाहणी करा अशी मागणी केली. याप्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्याचा ठपका ठेवून महसूल विभागानं शेतकर्‍यांवर गुन्हे दाखल केलेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 1, 2015 10:59 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close