S M L

अपघात रोखण्यासाठी बंद दरवाजांच्या लोकलचा प्रस्ताव

Sachin Salve | Updated On: Dec 2, 2015 01:50 PM IST

अपघात रोखण्यासाठी बंद दरवाजांच्या लोकलचा प्रस्ताव

local door02 डिसेंबर : मुंबईतल्या वाढते रेल्वे अपघात रोखण्यासाठी बंद दरवाजांच्या लोकल सुरू करण्याचा प्रस्ताव समोर आलाय. वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर मुंबई-ठाण्यातल्या शिवसेना-भाजपच्या खासदारांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेतली. आणि त्यांच्यापुढे मुंबईकरांना भेडसावणार्‍या समस्यांचं गार्‍हाणं मांडलं.

लोकलचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी मेट्रोसारखे स्वयंचलित बंद दरवाजे बसवण्याचा प्रस्ताव खासदारांनी ठेवला. त्यावर याबाबत एका महिन्याच्या आत अहवाल देण्याचे आदेश रेल्वेमंत्र्यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहे. याचबरोबर लोकलशी संबधित इतर अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवरही बैठकीत चर्चा झाली. पण बंद दरवाजाच्या लोकल सुरू करायला शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी मात्र विरोध केलाय. एसी लोकल नसल्यानं प्रवासी गुदमरण्याची भीती त्यांनी व्यक्त केलीय. मुंबईत तब्बल 75 लाख प्रवासी रेल्वेनं प्रवास करतात. रेल्वेचे दरवाजे बंद केले तर ते गुदमरतील, याची रेल्वेमंत्र्यांना जाण असावी असं अरविंद सावंत यांनी म्हटलंय. तसंच, दरवाजे बंद करून प्रवास करण्यासाठी आपल्या लोकल वातानुकुलीत नाही, असंही अरविंद सावंत सांगितलं.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 2, 2015 01:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close