S M L

एका बहाद्दराने ट्रॅक्टरच शेतात पुरला पण...

Sachin Salve | Updated On: Dec 2, 2015 04:56 PM IST

एका बहाद्दराने ट्रॅक्टरच शेतात पुरला पण...

02 डिसेंबर : चुकीच्या मार्गानं पैसे कमवणं समाजात नवीन नाही...पण असे पैसे कमवण्यासाठी माणूस कोणत्या थराला जाईल, किंवा काय शक्कल लढवेल, हे सांगता येत नाही...असाच किस्सा उस्मानाबादेत घडला. एका पठ्‌ठ्याने विम्याच्या पैशासाठी अख्खा ट्रॅक्टरच शेतात पुरला.

त्याचं झालं असं की, विम्याचे पैसे मिळावे म्हणून आपल्या ट्रॅक्टरला एकानं चक्क शेतात पुरून ठेवलं. आणि मग हे साहेब गेले पोलिसांकडे. या महाशयांचं नाव आहे बालाजी बानगुडे. साहेब सध्या फरार आहेत. बानगुडे यांनी ट्रॅक्टर चोरीला गेल्याची तक्रार पोलिसांकडे केली, आणि माझा ट्रॅक्टर शोधून द्या, असा तगादा लावला. पंचनाम्यासाठी पोलीस त्याच्या शेतात आले. तिथे पडलेल्या तुरट्या आणि लोखंडी पाईप पाहून त्यांना संशय आला. पोलिसांनी जमीन खणायला सुरुवात केली. बघतात तर काय, जमिनीत चक्क ट्रॅक्टर!!! बानगुडे यानंतर गावातून पळून गेला, सध्या तो फरार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 2, 2015 02:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close