S M L

सुनिता माकडे मृत्यूप्रकरणी आरोपी अजूनही फरारच

Sachin Salve | Updated On: Dec 2, 2015 04:44 PM IST

 सुनिता माकडे मृत्यूप्रकरणी आरोपी अजूनही फरारच

02 डिसेंबर : गेल्या अठरा दिवसानंतरही नागपूरच्या ग्रामीण पोलिसांना सुनिता माकडे या महिलेच्या मृत्यूप्रकरणी आरोपींना शोधता आलेलं नाही. सुनीता यांची मुलगी विशाखा हिची रस्त्यावर छेड काढत असताना गाडीला दिलेल्या धक्क्यामुळे सुनीता यांचा मृत्यू झाला होता.

विशाखा रामटेकला मोपेडला जात असताना गुंडांनी गाडीला धडक दिली. याचं सीसीटीव्ही फूटेजही पोलिसांकडे देण्यात आलं. पण अजूनही आरोपींचं साधं रेखाचित्रंही पोलिसांनी बनवलेलं नाही. अठरा दिवसांनंतर कोणतेही धागेदोरेसुद्धा पोलिसांना मिळू शकलेले नाहीत. उपराजधानी नागपूर आता गुन्ह्यांची राजधानी म्हणून ओळखलं जातंय. गुन्हे कमी होत नाहीयेत आणि अशा घटनांची दखल पोलीस गांभीर्यानं घेताना दिसत नाही.

नागपुरातील महिला सुरक्षिततेसंदर्भात आयबीएन लोकमतचे सवाल

1) गेल्या अठरा़ दिवसांपासून आरोपिंचा शोध घेण्यात नागपूर पोलिसांना अपयश का आले

2) नागपूर - रामटेक हायवेरील टोल नाक्यावरील सीसीटीव्ही वरील फुटेजच्या माध्यमातून तपास का नाही.

3) नागपूर आऊटर रिंग रोड परिसरात लोकांना त्रास देणार्‍या कुख्यात गुन्हेगारांच्या टोळीतील गुन्हेगारांची चौकशी का नाही.

4) या प्रकरणातील आरोपींचे पीडितांच्या माहितीच्या आधारे रेखाचित्र का काढण्यात आले नाही.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 2, 2015 04:44 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close