S M L

कर्ज वसुलीसाठी सावकारने विकली कर्जदाराची किडनी

Sachin Salve | Updated On: Dec 2, 2015 07:28 PM IST

कर्ज वसुलीसाठी सावकारने विकली कर्जदाराची किडनी

02 डिसेंबर : अकोल्यामध्ये कर्ज वसूल करण्यासाठी सावकाराने एका तरुणाची किडनी विकल्याची धक्कादायक घटना समोर आलीये. संतोष गवळी या तरुणाला जबरदस्तीने श्रीलंकेला नेऊन किडनी काढून घेण्यात आली. त्याची किडनी साडेचार लाखांना विकण्यात आली. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली.

हलाखाची परिस्थितीमुळे संतोष गवळी या तरुणाने सावकार आनंद जाधवकडून 20 हजार रुपयांचं कर्ज घेतलं होतं. संतोष हे कर्ज वेळेत फेडू शकत नव्हता. हा सावकार आनंद जाधव आणि देवेंद्र शिरसाठ या दोघांनी संतोष गवळीला धमकावलं. कर्ज फेडू शकत नसशील तर किडनी दे अशा शब्दात त्याच्यावर जबरदस्ती केली. त्यानंतर हतबल झालेल्या संतोषला नागपूरला नेऊन त्याची मेडिकल टेस्ट केली. नंतर त्याचा पासपोर्ट काढून श्रीलंकेला नेलं आणि तिथे त्याची किडनी काढून ती साडेचार लाखांना विकली. या सगळ्या प्रकरणात संतोषच्या हाती काहीच लागलं नाही. त्याची अक्षरश: पिळवणूक झाली. या प्रकरणी आता आनंद जाधव या सावकाराला आणि देवेंद्र शिरसाठला अटक करण्यात आलीय. या दोघांचे पासपोर्टही पोलिसांनी जप्त केलेत. पण या घटनेमुळे अकोल्यामध्ये किडनी विकणारं रॅकेटच असल्याचा पोलिसांना संशय आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 2, 2015 07:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close