S M L

शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार अपात्र उमेदवारांना दिले गेल्याचा आरोप

Sachin Salve | Updated On: Dec 2, 2015 09:58 PM IST

शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार अपात्र उमेदवारांना दिले गेल्याचा आरोप

02 डिसेंबर : क्रीडाक्षेत्रात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणार्‍या खेळाडूंना राज्य शासनातर्फे शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात येतं. मात्र या पुरस्कारासाठी आवश्यक असणार्‍या मुलभूत क्षमता नसणार्‍यांचं यंदाचा शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार असल्याचा आरोप ज्येष्ठ क्रीडा समीक्षक वि.वि.करमरकरांनी केलाय.

या पुरस्कारासाठी योग्यता असणारे अनेक धुरंधर खेळाडू राज्यात असतानाही निवड समितीच्या प्रस्तावाला केराची टोपली दाखवत केवळ जिल्हास्तरावरच काम करणारे गणपत माने तर पुण्याचे रमेश एन वीपट या दोघांना शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. यातली सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे विविध प्रकारच्या 17 खेळांमध्ये मार्गदर्शन करताना 292 खेळाडू घडवण्याचा दावा करणार्‍या गणपत माने यांना जीवनगौरव दिल्यानं या पुरस्कारांचे गौडबंगाल समोर आलंय.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 2, 2015 09:58 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close