S M L

गोळीबाराच्या घटनेनं अमेरिका पुन्हा हादरली, 14 जणांचा मृत्यू

Sachin Salve | Updated On: Dec 3, 2015 01:24 PM IST

गोळीबाराच्या घटनेनं अमेरिका पुन्हा हादरली, 14 जणांचा मृत्यू

03 डिसेंबर : अमेरिका पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटनेनं हादरली. कॅलिफोर्नियामध्ये 3 हल्लेखोरांनी बेधुंद गोळीबार केला यात 14 जणांचा मृत्यू झाला आहे तर 20 जण जखमी झाले आहेत. हल्ला केल्यानंतर हल्लेखोर पसार झाले.

अपंग व्यक्तींसाठीच्या एका केंद्रामध्ये 3 हल्लेखोर घुसले आणि त्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. यामुळे परिसरात खळबळ माजली. काही क्षणांतच पोलीस तिथे दाखल झाले, आणि इमारतीला घेरलं. संपूर्ण इमारतीची कसून तपासणी करण्यात आली पण तोपर्यंत हल्लेखोरांनी पळ काढला होता. हल्लेखोरांनी मास्क घातल्यामुळे सीसीटीव्हीमधून त्यांची ओळख पटणंही कठीण आहे. हा हल्ला कुणा माथेफिरूनं केला की दहशतवादी हल्ला होता, हे अजून स्पष्ट झालेलं नाही. 2012 मध्येही एका शाळेमध्ये काही माथेफिरूने गोळीबार केला होता यात 20 मुलांसह 26 जणांचा मृत्यू झाला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 3, 2015 01:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close