S M L

सत्तेत सहभागाची सेनेची आज वर्षपूर्ती, मंत्र्यांच्या कामगिरीचा अहवाल करणार जाहीर

Sachin Salve | Updated On: Dec 3, 2015 02:03 PM IST

सत्तेत सहभागाची सेनेची आज वर्षपूर्ती, मंत्र्यांच्या कामगिरीचा अहवाल करणार जाहीर

03 डिसेंबर : सत्तेत सहभाग होईन आज शिवसेनेला वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने शिवसेना आपल्या दहा मंत्र्यांचा वार्षिक कार्य अहवाल आज जाहीर करणार आहे. मुंबईतल्या रविंद्र नाट्यमंदीरात संध्याकाळी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सर्व दहा मंत्री त्यांचा कार्य अहवाल मांडणार आहेत.

गेल्यावर्षी 5 डिसेंबरला शिवसेना भाजपसोबत सत्तेत सहभागी झाली होती. याआधी 30 ऑक्टोबर रोजी भाजपच्या मंत्र्यांनीही राज्य सरकारची वर्षपूर्ती साजरी केली होती. पण या वर्षपूर्तीमध्ये शिवसेना सहभागी झाली नाही. आता शिवसेना त्यांच्या मंत्र्यांची वर्षपूर्ती साजरी करतेय. त्यामुळे सत्तेत एकत्र असूनही शिवसेना भाजपचा सवतासूभा सुरूच आहे. हे पुन्हा एकदा दिसून आलंय. दुसरीकडे राज्य मंत्रीमंडळांचा विस्तार हिवाळी अधिवेशनाधी करू असं आश्वासन देऊनही दिरंगाई होत असल्यामुळे घटक पक्षांप्रमाणे शिवसेनाही नाराज आहे. आज वर्षपूर्ती सोहळ्यात या नाराजी बद्दल शिवसेना पक्षप्रमुख काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 3, 2015 02:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close