S M L

देव तारी..!,3 वर्षांचा चिमुरड्या सातव्या मजल्यावरुन पडूनही सुखरुप

Sachin Salve | Updated On: Dec 3, 2015 07:44 PM IST

देव तारी..!,3 वर्षांचा चिमुरड्या सातव्या मजल्यावरुन पडूनही सुखरुप

03 डिसेंबर : "देव तारी त्याला कोण मारी..."या म्हणीचा प्रत्यय कळंबोलीमध्ये आला. सातव्या माजल्यावरुन पडून देखील एक 3 वर्षीय बालक सुखरुप बचावल्याचा चमत्कार घडलाय. आशिष मिश्रा असं या सुदैवी बालकाचं नाव आहे. तो कळंबोलीतील याच कृष्णा पार्क या इमारतीमध्ये आपल्या पालकांसोबत सातव्या मजल्यावर राहतो.

आशिषचे वडील कामानिमित्त बाहेर गेलेत. काल संध्याकाळी आशिष आपल्या घराच्या बाल्कनीत खेळत असताना अचानक तोल जाऊन बाल्कनीतून बाहेर पडला. पड़ताना एकदा तो पाचव्या मजल्यावरील छपरावर आदळून खाली पडला.  पड़तांना झालेल्या आवाजाने सुरक्षारक्षकाने आरडाओरड करत आशिषकड़े धाव घेतली. यावेळी तो बेशुद्ध पडला होता.

यानंतर आशिषला तातडीने वाशीच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी आशीषची प्रकृती ठिक असल्याचं सांगितलं. फ़क्त त्याच्या डोक्याला आणि हाताला किरकोळ दुखापत झाली आहे. सातव्या मजल्यावरुन पडून देखील सुखरुप बचावल्याबद्दल डाॅक्टरांनीही आश्चर्य व्यक्त केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 3, 2015 06:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close