S M L

यापुढचा मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच -उद्धव ठाकरे

Sachin Salve | Updated On: Dec 3, 2015 08:11 PM IST

यापुढचा मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच -उद्धव ठाकरे

03 डिसेंबर : यापुढचा मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच असेल आणि जनतेच्या कामांसाठी तो राज्यातच फिरेल असं म्हणत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. ते मुंबईत बोलत होते.

शिवसेनेच्या मंत्र्यांचा वर्षपूर्ती सोहळा मुंबईमध्ये रवींद्र नाट्य मंदिरात मोठ्या थाटात पार पडला. याआधी 30 ऑक्टोबरला भाजपच्या मंत्र्यांनी राज्य सरकारची वर्षपूर्ती साजरी केली होती. पण त्या कार्यक्रमात शिवसेनेनं सहभाग घेतला नव्हता. मात्र, याचा अर्थ आम्ही वेगळी चूल मांडलेली आहे, असा होत नाही, असं आजच्या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांना राज्यात फिरण्याचा सल्ला दिला. तसंच मराठवाड्यातल्या दुष्काळाबद्दल सरकारला जाब विचारणार असल्याचं स्पष्ट केलं. त्याचबरोबर लोकांपर्यंत जा असा सल्लाही शिवसेनेच्या मंत्र्यांना दिला. यापुढचा मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच असेल आणि जनतेच्या कामांसाठी तो राज्यातच फिरेल असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. मराठवाड्यात दुष्काळाचं मोठं संकट आहे, त्यावर लक्ष केंदि्रत करा असे आदेश देखील मंत्र्यांसहित सगळे आमदार आणि शिवसैनिकांना उद्धव ठाकरे यांनी दिला.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 3, 2015 08:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close