S M L

माणिकरावांचे घुमजाव

13 फेब्रुवारीमाय नेम इज कान या सिनेमाला होणार्‍या विरोधाचा धुरळा आता खाली बसू लागला आहे. पण त्याचवेळी सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील धुसफूस चव्हाट्यावर येऊ लागली आहे.शरद पवारांनी बाळासाहेबांची भेट घेतल्यानेच सेनेच्या आंदोलनाचा जोर वाढला. असे नुकतेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे म्हणाले होते. त्यावर दिल्लीत गेल्यावर दुसर्‍या पक्षाविषयी अशी वक्तव्ये करण्याची प्रथाच काँग्रेसमध्ये असल्याचे प्रत्युत्तर गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिले. पण आता खुद्द माणिकरावांनीच आपल्या वक्तव्यापासून घुमजाव केले आहे.शरद पवार कुठल्याही राजकीय हेतूने मातोश्रीवर गेले होते असे मी म्हटलेले नाही. शरद पवार यूपीएचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या भेटीमागे काही हेतू होता असे मला वाटत नाही, असे ठाकरे म्हणाले आहेत. मी केवळ लोकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे, असे म्हणालो होतो, अशी सावरासावरही त्यांनी केली आहे.तर याच वेळी माणिकरावांना राज्यातील आघाडी सरकार नीट चालू द्यायचे नाही. म्हणूनच ते दोन्ही पक्षात संबंध बिघडतील अशी वक्तव्ये वारंवार करत आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रकाश बिनसाळे यांनी केली आहे. भारतामध्ये आयपीएल सामन्यांच्या वेळी अनुचित प्रकार घडू नयेत आणि त्यामुळे भारताची प्रतिमा आंतरराष्ट्रीय पातळीवर मलिन होऊ नये हे सांगण्यासाठीच पवारांनी शिवसेनाप्रमुखांची भेट घेतली होती, असे स्पष्टीकरण बिनसाळे यांनी प्रसिद्धीपत्रक काढून केले आहे. ज्यांना राज्यातील आघाडी सरकारचे यश पाहवत नाही असे नेते वातावरण बिघडवणारी विधाने करत आहेत. माणिकरावांनी आधी राज्याची जबाबदारी पाहावी आणि मगच राष्ट्रीय पातळीवरच्या उठाठेवी कराव्यात, असा टोलाही त्यांनी बिनसाळे यांनी माणिकरावांना लावला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 13, 2010 12:03 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 13, 2010 12:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close