S M L

कोल्हापूरमध्ये वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंग, दारू पिऊन सिनिअर विद्यार्थ्यांनी केली मारहाण

Sachin Salve | Updated On: Dec 5, 2015 04:19 PM IST

कोल्हापूरमध्ये वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंग, दारू पिऊन सिनिअर विद्यार्थ्यांनी केली मारहाण

05 डिसेंबर : कोल्हापूरमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंगचा प्रकार घडलाय. सिनिअर विद्यार्थ्यांनी दारु पिऊन मारहाण केल्याचा आरोप ज्युनिअर विद्यार्थ्यांनी केलाय. या घटनेत 4 विद्यार्थी जखमी झाले आहे. काल गुरुवारी संध्याकाळी हा प्रकार घडला असून 4 पैकी एका विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर आहे.

राजर्षी शाहू वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थी हे एमबीबीएसचं शिक्षण घेतात. दुसर्‍या वर्षातले विद्यार्थी आणि तिसर्‍या वर्षातले विद्यार्थी यांच्यात हा प्रकार घडलाय. यावेळी सिनिअर विद्यार्थ्यांनी दारू पिऊन मारहाण केल्याचा आरोप ज्युनिअर विद्यार्थ्यांनी केलाय. याबाबतचा एक लेखी तक्रार अर्ज या विद्यार्थ्यांनी अधिष्ठाता जयप्रकाश रामानंद यांच्याकडं दिलाय.

त्यामुळे आता या प्रकऱणी 3 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली असून चौकशीचेही आदेश देण्यात आलेत. जखमी विद्यार्थी जयंत तोंडे हा या मारहाणीमध्ये आणि रॅगिंगमध्ये जखमी असून त्याच्यावर सीपीआर रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. त्यामुळं विद्यार्थ्यांच्या वसतिगृहामध्ये सगळं काही आलबेल नसल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय. आता चौकशीनंतर या विद्यार्थ्यांवर काय कारवाई होणार हे पाहावं लागणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 5, 2015 04:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close