S M L

विधान परिषदेच्या 2 जागेसाठी सर्वच पक्षात रस्सीखेच सुरू

Sachin Salve | Updated On: Dec 6, 2015 02:07 PM IST

vidhan06 डिसेंबर : विधान परिषदेच्या मुंबईतल्या दोन जागांसाठी आता सर्वच पक्षांच्या नेत्यांनी जोरदार तयारी सुरू केलीय. दुसरीकडे इच्छुक ही पक्षांमध्ये जोर लावायला लागले आहेत. मुंबईतल्या दोन जागांसाठी शिवसेनेकडून विद्यमान आमदार रामदास कदम यांचं नाव जवळपास निश्चित आहे. तर भाजपकडून नगरसेवक मनोज कोटक आणि शायना एनसी यांनी फिल्डिंग लावलीय. काँग्रेसनं सध्या विद्यमान असलेल्या भाई जगताप यांनाच पुन्हा उमेदवारी देण्याच निश्चित झाल्याचं समजतंय.

या दोन्ही जागांसाठी मुंबईतले 227 नगरसेवक मतदान करणार आहेत. त्यात सेनेची स्वतःची 75 मतं आहेतच जी सेनेच्या उमेदवाराला पहिल्या पसंतीची मत देतील. त्यामुळे सेनेला आमदारकी मिळवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार नाहीत. पण भाजप आणि काँग्रेला मात्र त्यासाठी मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे.

सेना आणि भाजपची युती असल्यामुळे भाजपच्या उमेदवाराला सेनेची दुसर्‍या पसंतीची सर्व मत मिळूनही उपयोग नाही कारण किमान 54 पहिल्या पसंतीची मत मिळण गरजेचे आहे. भाजपला जरी त्यांच्या 27 नगरसेवकांची आणि पुरस्कृत अशा चार नगसेवकांची 31 पहिल्या पसंतीची मतं पडली तरी त्यांना 23 मतांची गरज आहे. त्यासाठी भाजपला मनसेची मदत घ्यावी लागेल. आता मनसे भाजपला मदत करणार का? अस प्रश्न उपस्थित होतोय.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 6, 2015 02:07 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close