S M L

मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार

Sachin Salve | Updated On: Dec 6, 2015 04:55 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार

 

06 डिसेंबर : उद्यापासून राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू होतंय. त्या पार्श्वभूमीवर आज विरोधकांची पत्रकार परिषद झाली. सरकारकडून आयोजित केलेल्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकलाय. संसदीय कामकाजमंत्री गिरीष बापट यांनी विरोधकांची भेट घेऊन चहापानावरचा बहिष्कार मागे घेण्याची विनंती केली पण विरोधक बहिष्कारावर ठाम आहे.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारवर सडकून टीका केली. सरकारनं एका वर्षात कर्जरोख्यांचा आणि शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचा विक्रम केला. सरकार असंवेदनशील झालंय. आता तर मंत्र्यांच्या नातेवाईकांनी आत्महत्या करायला सुरुवात केलीय. 100 रुपयांत डाळ विकण्याचं नाटक करुन सरकारनं प्रसारमाध्यमांना सुद्धा फसवलंय. 'मन की बात' करु नका आता 'काम की बात' करा असा टोला विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावलाय.

तर या पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार यांनी वेगळ्या विदर्भावर वादग्रस्त वक्तव्य केलं. वेगळा विदर्भ ही नेत्यांची भूमिका, सर्वसामान्यांची नव्हे असं ते आधी म्हणाले, पण नंतर परिषदेत गोंधळ सुरू झाल्यावर त्यांनी सारवासारव केली.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 6, 2015 04:55 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close