S M L

अजित पवारांनी ओढावून घेतली विदर्भवाद्यांची नाराजी नंतर सारवासारव !

Sachin Salve | Updated On: Dec 6, 2015 06:56 PM IST

 अजित पवारांनी ओढावून घेतली विदर्भवाद्यांची नाराजी नंतर सारवासारव !

06 डिसेंबर : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आपल्या वक्तव्यामुळे अडचणीत सापडत असतात. आज नागपुरात पत्रकार परिषदेत वादग्रस्त व्यक्तव्य करून अजित पवारांनी विदर्भवाद्यांची नाराजी ओढावून घेतली. त्यानंतर सारवासारव करत प्रकरणावर पडदा टाकला.

त्याचं घडलं असं की, वेगळा विदर्भ ही नेत्यांची भूमिका आहे, सर्वसामान्यांची नव्हे असं वक्तव्य पवारांनी केलं. वेगळ्या विदर्भासाठी अनेक आंदोलनं झाली. अनेक वेळा यावर चर्चा झाली. विदर्भातील नेत्यांनी वेगळा विदर्भ व्हावा यासाठी होकार दिला. पण, विदर्भातील जनतेनं याबाबत काहीही मत प्रदर्शित केलं नाही. हा आजवरचा इतिहास आहे असंही पवार म्हणाले.

पवारांच्या या वक्तव्यामुळे परिषदेत गोंधळ सुरू झाला. त्यानंतर त्यांनी सारवासारव केली. राष्ट्रवादी पक्षाची भूमिका अशी आहे की, केंद्रात त्यांचं सरकार पूर्ण बहुमतात आहे. आणि राज्यात सत्तेत असलं तरी सर्वाधिक जागा त्यांच्याकडे आहे. उद्या जर त्यांनी वेगळ्या विदर्भाचा विषय सभागृहात मांडला तर आम्ही आमची भूमिका मांडू असा यू-टर्नच पवारांनी घेतला.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 6, 2015 06:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close