S M L

विरोधकांनी सहकार्य करावं, कामकाज चालू द्यावं -मुख्यमंत्री

Sachin Salve | Updated On: Dec 6, 2015 07:27 PM IST

विरोधकांनी सहकार्य करावं, कामकाज चालू द्यावं -मुख्यमंत्री

06 डिसेंबर :  उद्यापासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाची सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांनी सहकार्य करावं. आम्ही कोणत्याही मुद्यावर चर्चा करायला तयार आहोत पण विरोधकांनी कामकाज चालू द्यावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे.

गेल्या काही महिन्यांत सरकारसमोर अनेक अडचणीने ठाण मांडलं होतं. त्यामुळेच या अधिवेशनात डाळ, शेतकरी आत्महत्या या मुद्दयावरुन सरकारला घेरण्याचे विरोधकांचे मनसुबे आहेत. विरोधकांनी याही वर्षी चहापानावर बहिष्काराची परंपरा कायम राखली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, एकनाथ खडसे, सुभाष देसाई यांच्यासह संयुक्त पत्रकार परिषद घेतलीये.

राज्यात दुष्काळाची परिस्थिती भीषण आहे. आम्ही सरकारला मदतीसाठी अहवाल पाठवला होता. असा खुलासा करत विरोधकांनी अधिवेशनात सहकार्य करावं, कामकाज चालू द्यावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. तसंच आम्ही आमचे प्रतिनिधी पाठवून, विरोधकांना या नैसर्गिक संकटाचा एकत्रितपणे सामाना करू असं सांगितलं. पण विरोधकांनी राजकारणासाठी येण्याचं टाळलं. सर्वांनी एकत्र येऊन काम करायला हवं. आम्ही सर्व मुद्यांवर चर्चा करायला तयार आहोत, पण विरोधी पक्षांनी सभागृह चालू द्यावं असं मुख्यमंत्री म्हणाले.

पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकरांच्या नातेवाईकांनी नापिकीला कंटाळून आत्महत्या केली ही बातमी चुकीची आहे. घडलेला प्रकार असा नाहीच असं दावा मुख्यमंत्र्यांनी केला. तसंच कापसाची खरेदी सुरू झाली आहे. विक्री मोठ्या प्रमाणात होतेय. विक्री केंद्रावर आम्ही पुरेशी रक्कम दिली आहे. शेतकर्‍यांच्या मागणीनुसार आता त्यांना चेकने पैसे द्यायला सुरुवात केली आहे अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 6, 2015 07:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close