S M L

कांदा आता पुन्हा रडवणार, कांदा निर्यातदार बेमुदत संपावर

Sachin Salve | Updated On: Dec 7, 2015 08:17 PM IST

onion graph07 डिसेंबर : नाशिक जिल्ह्यातल्या सगळ्यात मोठी समिती मानल्या जाणार्‍या लासलगावमध्ये आज तब्बल 25 हजार क्विंटल कांद्याची आवक झाली होती. लिलाव सुरू होताच शनिवारच्या तुलनेत आज एका क्विंटलमागे 300 रुपयांनी भाव कोसळले. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले. शेतकर्‍यांनी आता आंदोलनाचा इशारा दिलाय.

नाशिक जिल्ह्यात लासलगाव सर्वात मोठी बाजार समिती मानली जाते आज या समितीत तब्बल 25 हजार क्विंटल कांद्याची आवक झाली होती .लिलाव सुरू होताच शनिवारचं तुलनेत आज क्विंटल मागे 300 रुपयांनी भाव कोसळल्याचे पाहून शेतकरी संतप्त झाले एका आठवड्यात कांदा 2500 शे रुपयावरून 1000 हजार रुपयावर आल्यामुळे शेतकर्‍यांचा संताप अनावर झाला व त्यांनी अगोदर लिलाव बंद पडला त्यांनतर विंचूर चौफुलीवर धाव घेऊन रस्ता रोको करून कांद्याला हमी भाव देण्याबरोबरच निर्यातमुल्य तातडीने कमी करण्याची मागणी केली. सरकारचे चुकीचे धोरण आणि व्यापार्‍यांची चालाकी याचा फटका आम्हाला बसतो असे शेतकर्‍यांनी सांगितलं. केंद्र सरकारने निर्यातमुल्यात मोठी वाढ केलेली आहे. त्यामुळे परदेशात कांदा पाठवणे कठीण झाले असून जर निर्यातमूल्य कमी केले नाही तर कांद्याचे भाव आणखी खाली येतील असे कांदा निर्यातदार इंदर चोपडा यांनी सांगितलं.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 7, 2015 07:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close