S M L

कोल्हापूर विधान परिषदेसाठी जागा असूनही काँग्रेसमध्येच रस्सीखेच !

Sachin Salve | Updated On: Dec 7, 2015 07:34 PM IST

कोल्हापूर विधान परिषदेसाठी जागा असूनही काँग्रेसमध्येच रस्सीखेच !

07 डिसेंबर : कोल्हापूर विधानपरिषदेसाठीही आता मोठी चुरस निर्माण झाली आहे. गेल्या महिन्यातच कोल्हापूरचं राजकारण ढवळून निघालं ते महापालिकेच्या निवडणुकीमुळे...त्यानंतर आता लगेचच विधानपरिषदेची निवडणूक जाहीर झाल्यामुळे जिल्ह्यात पुन्हा राजकीय वातावरण तापलं आहे. पण कोल्हापूर विधान परिषदेवर गेल्या 18 वर्षांपासून पकड आहे ती महादेव महाडिक यांची...खरं तर कोल्हापूरची जागा तशी काँग्रेसकडेच आहे. त्यामुळे यंदाही ही जागा जरी काँग्रेसकडेच असली तरी काँग्रेसमध्येच उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू झाली आहे.

विद्यमान आमदार महाडिक यांच्यासह माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, माजी मंत्री प्रकाश आवाडे हे चारही नेते इच्छूक आहेत. पण पक्षानं मात्र, अजून उमेदवारीबाबत निर्णय घेतलेला नाहीये. विशेष म्हणजे कोल्हापूर विधानपरिषदेची ही निवडणूक शिवसेना आणि भाजप लढवणार नाहीयेत. त्यामुळे काँग्रेससमोर अपक्ष उमेदवाराचंच आव्हान असणार आहे.

एक आमदारकी भाजपची आहे. तरीही कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत महाडिक यांनी भाजपची जवळीक साधून ताराराणी आघाडी आणि भाजप अशी निवडणूक लढवली. पण त्यांना यश आलं नाही. सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या गेलेल्या या निवडणुकीत काँग्रेसलाच मोठं यश मिळालं. त्यामुळं पक्ष पाटील यांना तिकीट देणार की अन्य कुणाला..मग त्यानंतर होणारी बंडखोरी..याचाही विचार खरं तर कोल्हापूरबाबत काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना करावा लागणार आहे.

आखाडा विधान परिषदेचा

मतदारांची संख्या - 387

काँग्रेस - 120

राष्ट्रवादी काँग्रेस - 117

जनसुराज्य शक्ती - 30

ताराराणी आघाडी - 19

शिवसेना - 9

जनता दल - 7

स्वाभिमानी शेतकरी संघटना - 6

इतर - 15

 

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 7, 2015 07:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close