S M L

नवी मुंबईत अघोषित पाणी कपात, प्रतिव्यक्ती मिळणार 270 लीटर पाणी

Sachin Salve | Updated On: Dec 7, 2015 09:42 PM IST

water-shortage MUMBAI07 डिसेंबर : अखेर नवी मुंबईत अघोषित पाणी कपात होणार आहे. प्रतिदिन प्रतिव्यक्ती 270 लीटर पाणी मिळणार आहे. यापूर्वीही प्रति व्यक्ती 335 लीटर पाणीपुरवठा करण्यात येत होता. पुढील वर्षी 31 मेपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा मोरबे धरणात असल्याची आयबीएन लोकमतने बातमी दिली होती. अखेर नवी मुंबई महापालिकेला जाग आली असून पालिकेनं अघोषित 20 टक्के पाणीकपात केलीये.

नवी मुंबईला केला जाणारा 425 दशलक्ष लिटर (MLD) पाणी पुरवठा आता 330 वर आणलाय. कपातीमुळे प्रतिदिन प्रती व्यक्ति पाण्याचा वापर ही 335 लिटर वरून 270 लिटरवर आलंय. 31 मे पर्यंतच शहराला पाणी पुरवठ्याचा साठा मोरबे धरणात असल्याचा आयबीएन लोकमतने जाहीर केल्या नंतर ही कपात करण्यात आलीये. माञ ही कपात महापालिका राजकीय दबावापोटी जाहीररित्या घोषणा करत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 7, 2015 09:42 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close