S M L

'पुणे' आणि 'राजकोट' आयपीएलच्या नव्या टीम

Sachin Salve | Updated On: Dec 8, 2015 03:34 PM IST

 'पुणे' आणि 'राजकोट' आयपीएलच्या नव्या टीम

08 डिसेंबर : आयपीएलच्या मैदानातून चेन्नई आणि राजस्थान टीम 'आऊट' झालीये. आणि आता या दोन्ही टीमची जागा घेण्यासाठी पुणे आणि राजकोट टीम मैदानात उतरणार आहे.

आयपीएलच्या पुढच्या सिझनमध्ये दोन नव्या टीम्स खेळतांना दिसणार आहे. आज झालेल्या लिलावामध्ये राजकोट आणि पुण्यानं बाजी मारली आहे. पुण्याच्या टीमची मालकी संजीय गोयंकांकडे गेली आहे. संजीव गोयंकांनी पुणे टीमसाठी तब्बल 16 कोटींची बोली लगावलीये. तर राजकोटची मालकी इंटेक्स ग्रुपकडे आहे. या ग्रुपने 10 कोटींची बोली लगावलीये. आयपीएलच्या गव्हर्निंग काऊंन्सिलच्या बैठकीनंतर दिल्लीमध्ये घोषणा करण्यात आली. राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन टीम्स, आयपीएलमधून निलंबित करण्यात आल्यात. त्यानंतर या दोन नवीन टीम्सचा आयपीएलमध्ये समावेश करण्यात आल्यात.

या आहे त्या 2 नवीन टीम्स

पुण्याची मालकी संजीव गोयंकांकडे

पुण्यासाठी - 16 कोटींची बोली

राजकोट - इंटेक्स ग्रुप

राजकोटसाठी - 10 कोटींची बोली

चेन्नई सुपरकिंग्ज आणि राजस्थान रॉयल्सच्या

जागी दोन नवीन टीम्स

 

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 8, 2015 03:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close