S M L

फूटपाथ अपघात प्रकरणी सलमानचा याच आठवड्यात फैसला ?

Sachin Salve | Updated On: Dec 8, 2015 07:13 PM IST

salman cry08 डिसेंबर : सलमान खान फूटपाथ अपघात प्रकरणी सोमवारपासून मुंबई हायकोर्टात अंतिम सुनावणीला सुरुवात झाली आहे. उद्याही हायकोर्टात ही सुनावणी सुरू राहणार आहे. याच आठवड्यात हायकोर्ट याबाबत अंतिम निकाल देण्याची शक्यता आहे.

2002 मध्ये अभिनेता सलमान खाननं भरधाव गाडी चालवत एका व्यक्तीला चिरडलं होतं, तर चार जणांना जखमी केलं होतं. मुंबई सेन्सश कोर्टाने या प्रकरणी सलमानला दोषी ठरवत 5 वर्षांची शिक्षा सुनावणी होती. यासंदर्भात सलमानच्या वकिलांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. आता 7 महिन्यांनंतर मुंबई हायकोर्टात अंतिम निर्णय सुनावणी होणार आहे. त्यामुळे सलमान खानचं काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 8, 2015 07:13 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close