S M L

राज्यात 2 नव्या महापालिका, पनवेल आणि अंबरनाथसाठी प्रस्ताव

Sachin Salve | Updated On: Dec 9, 2015 11:40 AM IST

राज्यात 2 नव्या महापालिका, पनवेल आणि अंबरनाथसाठी प्रस्ताव

09 सप्टेंबर : महामुंबई परिसरात दोन नव्या महापालिका स्थापण्याचा प्रस्ताव तयार झाला आहे. हा प्रस्ताव आहे पनवेल आणि अंबरनाथ या दोन नव्या महापालिका स्थापन करण्याचा. एमएमआरडीएने याचा आराखडा तयार केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेतील तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे.

ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, कुळगाव-बदलापूर नगरपालिकांचे एकत्रितकरण करुन अंबरनाथ ही नवी महानगरपालिका तर नवी मुंबईत परिसरातील उलवे, नवीन पनवेल, कळंबोली आणि खारघर यांचा पनवेल महानगरपालिकेत समावेश करुन एक नवी महानगरपालिका स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे. एमएमआरडीएच्या 26 ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत प्रारुप प्रस्तावास मान्यता देण्यात आल्याची

मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली. मुंबई महानगर नियोजन समितीकडून हे प्रारुप अंतिम करण्यात येणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या दोन्ही महापालिकांच्या निर्मितीसाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समितीची स्थापना करण्यात आलीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 9, 2015 08:47 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close