S M L

दिवा 'धूर'कांड प्रकरणी 55 ड्रम्स सापडले

Sachin Salve | Updated On: Dec 9, 2015 01:22 PM IST

दिवा 'धूर'कांड प्रकरणी 55 ड्रम्स सापडले

09 सप्टेंबर : मुंबईतील दिवा-शिळ रोड मंगळवारी रात्री धुराचं साम्राज्य पसरल होतं. इथल्या डम्पिंग ग्राउंड वर कुणीतरी रसायन आणून टाकल्याने हा धूर पसरला होता. दिवा डम्पिंग ग्राऊंडवर केमिकलचे 55 ड्रम्स सापडले आहेत. या केमिकलच्या त्रासामुळे अग्निशामक दलाचा एक अधिकारी अत्यवस्थ झालाय. त्यांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

या प्रकरणात महापालिका आयुक्त फिरती प्रयोग शाळा घटनास्थळी दाखल झालीय. पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आहे. या प्रकरणी आयुक्त आणि महापौरांवर गुन्हा दाखल करणार असल्याचं मनसे नगरसेवक शैलेश पाटील यांनी सांगितलं.

अचानक धूर निर्माण झाल्यामुळे लोकांना वस्तीतील रस्ता देखील दिसत नव्हता. एवढंच नाहीतर या धुरामुळे दिवा शिळ परिसरातल्या वैभव धाबा रस्त्यावर एक अपघातही झालाय. आता मात्र, तिथलं धुराचं साम्राज्य काहिसं कमी झालंय. पण, हे कारस्थान कुणी आणि का केलं याचा शोध घेतला जात आहे.

IBN लोकमतचे सवाल

दिवा-शिळच्या डम्पिंग ग्राऊंडवर नेमकं कोणी केमिकल टाकलं?

अज्ञातांनी डम्पिंग ग्राऊंडवर केमिकल टाकेपर्यंत प्रशासन काय करत होतं?

दिवा- शिळमध्ये धुराचं प्रदुषण करणारे गुन्हेगार गजाआड होणार का ?

 

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 9, 2015 01:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close