S M L

मश्गुल मुख्य सचिव

15 फेब्रुवारीशनिवारी पुण्यात झालेल्या स्फोटानंतर मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांसह केंद्रीय गृहमंत्र्यांनीही पुण्याला तातडीने भेट दिली. सगळी सरकारी यंत्रणा कामाला लागली. मात्र राज्याचे मुख्य सचिव जे. पी. डांगे यावेळी अकोल्यात हार तुरे आणि सत्कार समारंभात मश्गुल होते.स्फोटानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने सर्व वरिष्ठ अधिकार्‍यांची आपत्कालीन बैठक बोलावली या बैठकीला रजेवर असलेले डांगे उपस्थित नव्हते. दुसर्‍या दिवशी सकाळी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम, मुख्यमंत्री चव्हाण आणि आर आर यांच्याबरोबर इतर मंत्र्यांनीही पुण्याला भेट दिली. पण प्रशासनाचे मुख्य म्हणून रविवारीही त्यांच्यासोबत डांगे दिसले नाहीत.रविवारी डांगे अकोल्यातील माजी मंत्री बाबासाहेब धाबेकर, सुभाष कोरपे यांच्या घरी जाऊन आले. त्यानंतर ते मुंबईला रवाना झाले.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 15, 2010 10:09 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 15, 2010 10:09 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close