S M L

फुटपाथ अपघात प्रकरणाचा उद्या हायकोर्टात लागणार निकाल

Samruddha Bhambure | Updated On: Dec 9, 2015 10:35 PM IST

Hit and run salman

09 डिसेंबर : अभिनेता सलमान खान फुटपाथ अपघात प्रकरणाची अंतिम सुनावणी मुंबई हायकोर्टात सुरू आहे. निकालपत्राचे वाचन करण्यात येत आहे. त्यावेळी हे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.

अभिनेता सलमान खान फुटपाथ अपघात प्रकरणातील महत्त्वाचे साक्षीदार हवालदार आणि सलमान खानचा बॉडीगार्ड रवींद्र पाटील यांची साक्ष आरोपांसंदर्भात कायद्यातील तरतुदींनुसार ग्राह्य धरता येणार नाही, असं हायकोर्टाने म्हटलं आहे. हा अपघात झाला त्यावेळी रविंद्र पाटील सलमानच्याच गाडीत होता. रवींद्र पाटील यानेच या अपघाताची माहिती बांद्रा पोलीस स्टेशनला दिली होती. रवींद्र पाटील यांचा काही वर्षांपूर्वीच मृत्यू झाला. मृत्यूआधी याप्रकरणी कोर्टात त्यांनी साक्ष नोंदवली होती. त्यामध्ये सलमान खान मद्यप्राशन करुन गाडी चालवत असल्याची माहिती पाटील यांनी दिली होती. पण, आता त्यावर कोर्टाने वेगळे निरीक्षण नोंदवले आहे. सलमान खानच्या गाडीचा अपघात होण्यापूर्वी टायर फुटला की अपघातानंतर फुटला, याबद्दलही कोर्टात सादर करण्यात आलेले पुरावे अपुरे असल्याचं कोर्टाने म्हटलं आहे. सरकारी पक्षाने टायर फुटण्याचा तांत्रिक अहवाल त्यावेळी घ्यायला हवा होता, असं निरीक्षण कोर्टाने नोंदविलं आहे.

दरम्यान, या प्रकरणात सुरूवातीला 29 साक्षीदार होते मात्र एकटा रविंद्र पाटील वगळता 28 जणांनी आपली साक्ष कोर्टात फिरवली. त्यामुळे सुनावणीच्या अंतीम टप्प्यात रविंद्र पाटील याची साक्ष बाजुला काढली तर सलमान विरुद्ध मोठा पुरावा राहणार नाहीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 9, 2015 08:02 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close