S M L

रमेश कदमांचा प्रताप, तब्बल 59 गाड्या धूळ खात !

Sachin Salve | Updated On: Dec 10, 2015 11:19 AM IST

रमेश कदमांचा प्रताप, तब्बल 59 गाड्या धूळ खात !

10 डिसेंबर : साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विकास महामंडळात झालेल्या गैरव्यवहारामुळे आमदार रमेश कदम यांना जेलची हवा खावी लागली. पण, रमेश कदम यांचा आणखी एक प्रताप समोर आलाय.

शेतकर्‍यांनी उत्पादन केलेला माल थेट ग्राहकांना विकण्यासाठी 'ताजी भाजी तुमच्या दारी' ही योजना सुरू केली होती. त्यासाठी शेतातील ताज्या भाज्या तात्काळ ग्राहकांना विकण्यासाठी 59 गाड्या खरेदी केल्या होत्या. या खरेदी केलेल्या गाड्या लाभाथीर्ंना देण्यासाठी याच वर्षी सप्टेंबर महिन्यात सरकारने आदेशही काढले. पण हे आदेश फक्त कागदावरच राहिलेत. प्रत्यक्षात या गाड्या आजही ठाणे शहरात धूळ खात पडून आहेत. त्यामुळे या कोट्यवधीच्या गाड्यांचं पुढे होणार काय हा प्रश्न उपस्थित झालाय.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 10, 2015 11:19 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close