S M L

परप्रांतीयांनी अनुभवला माणुसकीचा झरा

15 फेब्रुवारीप्राची कुलकर्णी पुण्यात जर्मन बेकरीत झालेल्या स्फोटात अनेकजण जखमी झाले. यापैकी अनेकजण पुण्याच्या बाहेरचे आहेत. स्फोटाचा प्रत्यक्ष अनुभव घेतल्याने त्यांना धक्का बसला आहे. पण अशावेळी मिळालेल्या आपुलकीमुळे ते भारावून गेले आहेत.यातीलच एक आहे, नागार्जुन. आयटी कंपनीत नोकरी मिळाल्याने नागार्जुन एका आठवड्यापूर्वीच पुण्यात आला होता. कंपनीतील मित्रांनी त्याला जर्मन बेकरीविषयी सांगितले. आणि विकेंड असल्याने नागार्जुन या बेकरीत गेला. त्याच्याच कंपनीत काम करणार्‍या अश्वीनशी त्याची मैत्री झाली होती. प्रोजेक्ट संदर्भात बोलण्यासाठी अश्वीनने नागार्जुनला फोन केला. ते बोलत असतानाच फोन पडल्याचा आवाज अश्वीनला ऐकू आला. नेमके काय झाले ते कळायला मार्ग नसल्याने अश्वीन बेचैन झाला. इतक्यात त्याला स्फोट झाल्याची माहिती मिळाली.चिंतेत असलेल्या अश्वीनला कंपनीतील मॅनजरने नागार्जुन सुखरुप असल्याचा निरोप दिला. नागार्जुनला भेटण्यासाठी त्यांनी जहांगीर हॉस्पिटल गाठले. आठवडाभराच्या ओळखीतच मिळालेल्या या मित्रप्रेमामुळे नागार्जुनला धीर आला. नागार्जुनसारखे स्फोटात जखमी झालेले अनेकजण पुण्याचे नाहीत. पण स्फोटानंतर मिळत असलेल्या प्रेमामुळे ते धक्क्यातून सावरत आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 15, 2010 10:24 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 15, 2010 10:24 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close