S M L

26/11 हल्ला : डेव्हीड हेडलीने दिली सर्व गुन्ह्यांची कबुली

Samruddha Bhambure | Updated On: Dec 10, 2015 10:15 PM IST

26/11 हल्ला : डेव्हीड हेडलीने दिली सर्व गुन्ह्यांची कबुली

Mezzanine_392

10 डिसेंबर : 26/11 रोजी मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा एक सूत्रधार डेव्हिड हेडलीने आज (गुरूवारी) आपल्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे. मुंबई हल्ल्यातील मास्टर माईंड डेव्हिड हेडलीचा आज व्हिडिओ कॉन्फरेन्सींगद्वारे जबाब नोंदवण्यात आला. त्यावेळी त्याने आपल्याला सर्वच गुन्हे कबुल असल्याची कबुली दिली आहे.

डेव्हिड हेडलीने मुंबईतील 26/11 च्या हल्ल्यात आपला सहभाग असल्याचं म्हटलं आहे. तसंच या हल्ल्याच्या पथकात मी होतो, असं सांगत त्याने माफीचा साक्षीदार बनवण्याची विनंती न्यायालयासमोर केली. अमेरिकन न्यायालयाने मंजुरी दिल्यानंतर आज संध्याकाळी 6.30 वाजता व्हिडिओ कॉन्फरसिंगने मुंबई सेशन कोर्टात हेडलीचा ऑनलाईन जबाब नोंदवण्यात आला. हेडलीवर मुंबई हल्ल्याप्रकरणी विविध 11 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मुंबईवर 26/11ला झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या खटल्यात सध्या अमेरिकेत शिक्षा भोगत असलेला लष्करे तैय्यबाचा दहशतवादी डेव्हिड हेडली याला आरोपी करण्याला विशेष न्यायालयाने मंजुरी दिली होती. त्यासाठी हेडलीला 'व्हिडीओ कॉन्फरन्सिंग'द्वारे हजर करता यावं, यासाठी अमेरिकन न्यायालयाकडून परवानगी मागणारं पत्र मुंबई पोलिसांनी पाठवलं होतं. त्याला अमेरिकन न्यायालयानेही परवानगी दिली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 10, 2015 10:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close