S M L

मुंबईत यायचंय, तर 2027 पर्यंत टोल भरावाच लागेल !

Sachin Salve | Updated On: Dec 11, 2015 02:27 PM IST

मुंबईत यायचंय, तर 2027 पर्यंत टोल भरावाच लागेल !

11 डिसेंबर : मुंबई शहराच्या एंट्री पॉईंटवरची टोलवसुली ही 2027 पर्यंत सुरूच राहणार आहे अशी माहिती एमएसआरडीसीचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात दिलीय. संबंधीत टोल कंत्राटदारांसोबत सरकारने केलेले करार रद्द करणं सध्यातरी अशक्य असल्याने मुंबईकरांना हा टोल भरावा लागणार असल्याचं शिंदेंनी म्हटलंय.

मुंबईच्या टोलवसुलीचा आढावा घेण्यासाठी राज्यसरकारने एक अभ्यास समिती नेमली होती. त्या समितीनेच हा अहवाल दिल्याचं एकनाथ शिंदेंनी आज यासंबंधीच्या प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केलंय. विशेष म्हणजे, मुंबईच्या 5 टोलमधून एमईपी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला 1176 कोटी प्राप्त झाले आहे. टोल आणि वाहन संख्येत दरवर्षी होणारी वाढ पाहता 16 वर्षांच्या टोल वसुलीच्या ठेक्यात कंपनीस तिप्पट नफा होणार खरं आहे का ? असा सवाल शिंदेंना विचारला असता त्यांनी स्पष्टपणे नकार दिला. ऑगस्ट 2015 अखेरपर्यंत MEP कंत्राटात झालेल्या वसुलीची रक्कम 1362.59 कोटी असून 16 वर्षांच्या ओएमटी म्हणजेच टोलवसुली आणि दुरस्तीखर्चासाठी कंत्राटात होणार्‍या वसुली व खर्चाचा हिशेब पाहता 12.60 टक्के आरआर यायची शक्यता आहे अशी माहिती शिंदेंनी दिली. तसंच शासन अधिसुचनेप्रमाणे मुंबईतील 5 टोल नाक्यांवर 30 सप्टेंबर 2027 पर्यंत पथकर वसुली करायची आहे. सदर कंत्राट रद्द करण्याचे कोणतेही कायदेशीर कारण नाही. मुंबई टोल बाबत जी समिती नेमली आहे. त्या समितीच्या अहवालावर हे टोल रद्द होतील की नाही हे ठरेल. पण हे कंत्राट रद्द करणार करणार नसल्याचं सरकारने स्पष्ट केलंय. त्यामुळे राज्यभरातून मुंबईत येणार्‍या प्रवाशांना 2027 सालापर्यंत टोलचा भूर्दंड हा सोसावाच लागणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 11, 2015 01:22 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close