S M L

रेल्वेच्या टॉयलेटमध्ये वृद्ध महिलेचा पाय अडकला

Sachin Salve | Updated On: Dec 11, 2015 01:53 PM IST

रेल्वेच्या टॉयलेटमध्ये वृद्ध महिलेचा पाय अडकला

11 डिसेंबर : कोकणच्या दिशेनं निघालेल्या रेल्वेच्या टॉयलेटच्या होलमध्ये एका वृद्ध महिलेचा पाय अडकल्याची घटना घडलीये. तब्बल 9 ते 10 तास या महिलेचा पाय टॉयलेटमध्ये अडकला होता. अशा परिस्थिती या महिलेनं पनवेल ते रत्नागिरीपर्यंत प्रवास केला.

रबियाबी नावाचा या वृद्ध महिलेनं ठाण्यातून करमाळी गोव्याला जाण्यासाठी कोकण कन्या एक्स्प्रेसने प्रवास सुरू केला. रात्री चिपळूण-खेड स्टेशनदरम्यान ही महिला टॉयलेटमध्ये गेली असता अचानक पाय घसरला आणि मांडीपर्यंत पाय टॉयलेटच्या होलमध्ये अडकला. धक्कादायक म्हणजे, या महिलेचा पाय टॉयलेटमधून खालपर्यंत आला होता आणि तो स्पष्टपणे दिसत होता. या महिलेच्या पतीने तातडीने रेल्वे प्रशासनाकडे मदत मागितली. तोपर्यंत रेल्वे रत्नागिरीपर्यंत पोहचली होती. रत्नागिरी स्टेशनवर रेल्वे थांबवण्यात आली आणि दोन्ही डबे वेगळे करण्यात आले. या महिलेला कोणतीही इजा होऊ नये याची दक्षता घेत रेल्वे कर्मचार्‍यांनी टॉयलेटचा पाईप कापून टाकला. तब्बल 10 तासांनंतर या महिलेची टॉयलेटच्या पाईपमधून सुटका झाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 11, 2015 01:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close