S M L

दुहेरी हत्याकांडाने मुंबई हादरली, दोघांचे मृतदेह बॉक्समध्ये भरून गटारात फेकले

Sachin Salve | Updated On: Dec 14, 2015 11:30 AM IST

दुहेरी हत्याकांडाने मुंबई हादरली, दोघांचे मृतदेह बॉक्समध्ये भरून गटारात फेकले

14 डिसेंबर : मुंबापुरी निर्घृण अशा हत्याकांडाने हादरलीये. कांदिवलीमध्ये दोघांची हत्या करून मृतदेह बॉक्समध्ये भरून गटारात फेकून दिल्याची खळबळजनक घटना घडलीये. सुप्रसिद्ध चित्रकार हेमा उपाध्याय आणि त्यांचे वकील हरीश भंबानी यांची मारेकर्‍यांनी निर्घृण हत्या केलीये. मृतदेहाची ओळख पटली असून तीन याप्रकरणी तीन संशयिताना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. यामध्ये हेमा उपाध्यायचा नवरा चिंतन उपाध्यायचाही समावेश आहे. पोलीस त्याची चौकशी करत आहे. हे खून व्यावसायिक आणि कौटुंबिक कारणामुळे झाले असावेत, असा पोलिसांचा संशय आहे.

हेमा उपाध्याय आणि हरीश भंबानी 11 डिसेंबर पासून बेपत्ता होते. कांदिवलीच्या पश्चिमेला असलेल्या लालजीपाडाच्या गटारात 45 वर्षांच्या हेमा उपाध्याय आणि त्यांचा 65 वर्षांचा वकील हरीश भंबानी यांचे मृतदेह वेगवेगळ्या बॉक्समध्ये ठेवून ते बॉक्स गटारात फेकण्यात आले होते. दोन्ही बॉक्सला प्लॅस्टिकने गुंडाळण्यात आले होते. सकाळी साडेसातच्या सुमारास सफाई कर्मचारी सफाई करीत असाताना त्यांना हे बॉक्स दिसताच त्यांनी तात्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली. काही तासांपूर्वी हे बॉक्स गटारात फेकण्यात आल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. नेमकं हत्याकांड का घडलं असावं याचा पोलीस शोध घेत आहे.

कोण होती हेमा उपाध्याय ?

- मुंबईतली प्रसिद्ध चित्रकार आणि शिल्पकार

- गुजरातमधील वडोदरात जन्म

-1990 मध्ये मुंबईत दाखल

- 1998 मध्ये चिंतन उपाध्यायशी लग्न

- 2001 मध्ये मुंबईत चित्रांचं पहिलं प्रदर्शन

- 2003 मध्ये नवरा - चिंतन उपाध्यायसह प्रदर्शन

- कलेचे अनेक पुरस्कार प्राप्त

- 2010 मध्ये विभक्त होण्यासाठी अर्ज

-2013 मध्ये हेमाने नवरा चिंतन घराच्या भिंतींवर आक्षेपार्ह चित्र काढत असल्याचा आरोप केला होता

कोण होते हरिश भंबानी ?

- व्यवसायाने वकील

 - सध्या किंग्स सर्कलमध्ये पत्नी आणि मुलासोबत रहात होते

- 2013 मध्ये हेमाच्या घटस्फोटासाठी वकील

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 14, 2015 08:48 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close