S M L

शाहरुखचा 'दिलवाले'वर बहिष्कार टाका, मनसेचं आवाहन

Samruddha Bhambure | Updated On: Dec 14, 2015 07:56 PM IST

शाहरुखचा 'दिलवाले'वर बहिष्कार टाका, मनसेचं आवाहन

14 डिसेंबर :  शाहरुखचा दिलवाले या चित्रपटावर प्रेक्षकांनी बहिष्कार टाकावा, असं आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेनी केलं आहे. शआहरुख मुंबईत राहतो. त्याला चेन्नईतल्या पूरग्रस्तांना मदत करावीशी वाटली, पण इथल्या शेतकर्‍यांना त्यानं मदत केली नाही, म्हणून दिलवालेवर बहिष्कार टाका, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

शाहरुख आणि काजोल यांचा दिलवाले हा सिनेमा येत्या 18 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. त्याआधीच हा चित्रपट वादात अडकण्याची शक्यता आहे. शाहरुखने चेन्नईतील पूरग्रस्तांना 1 कोटी रुपयांची मदत केली. मात्र महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकरी त्याला दिसला नाही, असा आरोपही मनसेने केला आहे. त्यामुळेच शाहरुखचा दिलवाले न पाहता, त्याऐवजी तो पैसा गोळा करून अभिनेता मकरंद अनासपुरे आणि नाना पाटेकर यांच्या नाम या संस्थेला द्या, असं आवाहनही मनसेने केलं आहे.

मनसेने जाहीर केलेल्या भूमिका वर शाहरुखनं अजून प्रतिक्रिया दिलेली नसली, तरी महाराष्ट्रातील जनता या चित्रपटाला कसा प्रतिसाद देते याकडेच सर्वांच लक्ष असणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 14, 2015 07:56 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close