S M L

बुलेट ट्रेन आधी मुंबईची लोकल सुधारा, सेनेचा विरोध

Sachin Salve | Updated On: Dec 15, 2015 11:32 AM IST

बुलेट ट्रेन आधी मुंबईची लोकल सुधारा, सेनेचा विरोध

15 डिसेंबर : स्मार्ट सिटीचा मुद्दा निवळत नाही तर आता बुलेट ट्रेनवरून राजकारण सुरू झालंय. शिवसेना आणि काँग्रेसनं पंतप्रधान मोदींच्या आवडत्या बुलेट ट्रेन प्रकल्पाला विरोध केला आहे. आधी मुंबईतल्या लोकल ट्रेन आणि रेल्वे स्थानकं सुधारा, मग आपण बुलेट ट्रेनचं बघू असं शिवसेनेनं ठणकावलं. तसंच एक लाख कोटींचं कर्ज काढण्याआधी मुंबईतले प्लॅटफॉर्म नीट बांधा मुंबईतल्या माणसांचा आधी विचार करा, असा सल्लावजा टोला सेनेचे खासदार संजय राऊतांनी लगावला. त्याला काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांनीही पाठिंबा दिलाय.

बुलेट ट्रेन जगात कुठेही यशस्वी झालेली नाही. एक लाख कोटी रुपये एवढी मोठी रक्कम यावर खर्च करणं योग्य आहे का, याचा विचार सरकारनं करावा, असं सातव म्हणाले. सेनेला भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी चोख उत्तर दिलंय. संजय राऊत यांच्या वक्तव्याला महत्व देण्याची गरज नाही. राऊतांना बरळण्याची सवय आहे, त्यांच्या या वक्तव्याला काहीही अर्थ नाही. आधी मुंबईतले रस्ते आणि बेस्ट सुधारा, असं प्रत्युत्तर भांडारींनी दिलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 15, 2015 08:54 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close