S M L

जयप्रभा स्टुडिओ हेरिटेज वास्तूच,लतादीदींची याचिका फेटाळली

Sachin Salve | Updated On: Dec 15, 2015 09:14 AM IST

जयप्रभा स्टुडिओ हेरिटेज वास्तूच,लतादीदींची याचिका फेटाळली

 15 डिसेंबर : कोल्हापूरमधील जयप्रभा स्टुडिओ हेरिटेज वास्तूच राहणार आहे. राज्य सरकारच्या निर्णयाविरोधातली गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली आहे. पालिका आपल्या हक्काची जागा बळकावत असल्याचा आरोप लता मंगेशकर यांनी केला होता. मात्र, कोर्टाने लतादीदींची याचिका फेटाळून लावलीय.

चित्रमहर्षी भालजी पेंढारकर यांची कर्मभूमी आणि अनेक दर्जेदार मराठी चित्रपटांचे निर्मितीस्थान असलेला कोल्हापूरच्या जयप्रभा स्टुडिओचा हेरिटेज दर्जा मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी कायम राखला. यामुळे  या वास्तूचे सांस्कृतिक संचित म्हणून जतन करणे शक्य होणार आहे. जयप्रभा स्टुडिओची जागा गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या मालकीची आहे.

राज्य सरकारने 29 फेब्रुवारी 2012 रोजी अधिसूचना काढून जयप्रभा स्टुडिओचा समावेश हेरिटेज-33 दर्जाच्या वास्तूत केल्यानंतर, लता मंगेशकर यांनी या विरुद्ध रिट याचिका केली होती. गेल्या सप्टेंबरमध्ये अंतिम सुनावणी पूर्ण झाल्यानंतर राखून ठेवलेला निकाल न्या. अभय ओक आणि न्या. विजय अचलिया यांच्या खंडपीठाने सोमवारी जाहीर केला. लता मंगेशकर यांच्या वतीने ज्येष्ठ वकील गिरीश गोडबोले यांनी मांडलेले आक्षेपाचे सर्व मुद्दे सविस्तरपणे फेटाळणारे 45 पानी निकालपत्र देऊन न्यायालयाने लतादीदींची याचिका फेटाळून लावली.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 15, 2015 09:14 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close