S M L

अजय-अतुलची गरुडझेप, फोर्ब्सच्या यादीत पटकावले 82 वे स्थान

Sachin Salve | Updated On: Dec 15, 2015 12:01 PM IST

अजय-अतुलची गरुडझेप, फोर्ब्सच्या यादीत पटकावले 82 वे स्थान

15 डिसेंबर : मराठमोळी संगीतकार जोडी अजय-अतुल यांच्या शीरपेचात आज आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. अजय-अतुल यांचा फोर्ब्सच्या यादीत समावेश झाला आहे. 27.5 कोटी उत्पन्नासह या दोघांनी 82 व्या क्रमांकावर स्थान पटकावलंय.

फोर्ब्सने इंडिया सेलिब्रिटी 100 च्या यादी जाहीर केली आहे. अजय-अतुलने मराठी चित्रपटासह हिंदी चित्रपटांना संगीतबद्ध केलंय. अलीकडेच प्रदर्शित झालेला ब्रदर्स सिनेमाला अजय-अतुलने संगीत दिलंय. त्या अगोदर 'अग्नीपथ' हा पहिला हिंदी सिनेमा संगीतबद्ध केला होता. त्यांच्या या कार्याची फोर्ब्सने दखल घेतलीये. अजय-अतुलने 'लयभारी'सह अनेक मराठी सिनेमा संगीतबद्ध करत मराठी रसिकांची पसंती मिळवलीये. आज फोर्ब्स यादीत स्थान पटकावत फोर्ब्सच्या यादीवर मराठी ठसा उमटावलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 15, 2015 12:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close