S M L

धोणी 'पुणेकर' तर रैना राजकोटचा 'राजा'

Sachin Salve | Updated On: Dec 15, 2015 02:16 PM IST

धोणी 'पुणेकर' तर रैना राजकोटचा 'राजा'

15 डिसेंबर : आयपीएलमध्ये नव्याने दाखल झालेल्या पुणे आणि राजकोट टीमसाठी खेळाडूंचा लिलाव पार पडला. आज लागलेल्या लिलावामध्ये महेंद्रसिंग धोणी आणि सुरेश रैना सर्वात महागडे प्लेअर ठरले. या दोघांसाठी 12.5 कोटींची बोली लागली. धोणी आता पुण्याच्या टीमकडून खेळणार आहे. तर सुरेश रैना राजकोटच्या टीममध्ये असले. तसंच रविंद्र जडेजाही राजकोट टीमकडून खेळणार आहे.

स्पॉट फिक्सिंग प्रकरणी चेन्नई आणि राजस्थान टीम बाद झाली. त्यामुळे या दोन्ही टीमचे खेळाडू कुणाकडून खेळणार याची उत्सुकता होती. अपक्षेप्रमाणे धोणी आणि रैनाची जोडी आता वेगळी झालीये. धोणी आता पुणे टीमकडून खेळणार आहे. आणि रैना राजकोट टीमकडून खेळणार आहे. त्याशिवाय अजिंक्य रहाणे आणि रविंद्र जाडेजा यांच्याकडेही सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या. या दोघांसाठी 9.5 कोटींची बोली लागली. अजिंक्य रहाणे पुण्याच्या टीममध्ये असेल तर रविंद्र जाडेजा राजकोटकडून खेळणार आहे.

अशी असेल पुण्याची टीम

महेंद्रसिंग धोनी - 12.5 कोटी

अजिंक्य रहाणे - 9.5 कोटी

आर.आश्विन - 7.5 कोटी

स्टिव्ह स्मिथ - 5.5 कोटी

ड्युप्लीसीस - 4 कोटी

अशी असले टीम राजकोट

- सुरेश रैना - 12.5 कोटी

- रविंद्र जाडेजा - 9.5 कोटी

- ब्रँडन मॅक्युलम - 7.5 कोटी

- जेम्स फॉकनर - 5.5 कोटी

- ड्वेन ब्राव्हो - 4 कोटी

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 15, 2015 02:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close