S M L

कृषी विद्यापीठांना सहावा वेतन आयोग

17 फेब्रुवारी राज्यातील चारही कृषी विद्यापीठांना सहावा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच मुंबई मोटार वाहन कर अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला आहे. यात कराची रक्कमही वाढवली जाणार आहे. बैठकीमध्ये 16 मंत्र्यांनी व्हिजन डॉक्युमेंट प्रेझेंटेशन केले आहे. राज्यातील आघाडी सरकारला 100 दिवस पूर्ण झालेत. या पार्श्वभूमीवर 100 दिवसांमध्ये झालेली कामे आणि पुढच्या योजना तयार करण्याच्या सूचना सर्व मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी दिल्या होत्या.काय आहे, सरकारच्या व्हिजन डॉक्युमेंटमध्ये?1. झोपडपट्टीमुक्त महाराष्ट्राची संकल्पना 2. मुंबई आणि इतर शहरांतील 10 लाख अनधिकृत झोपडीधारकांना पक्की घरे3. 22 लाख लोकांना 20 बाय 20 चे प्लॉटस् 4. दारिद्रय रेषेखालच्या 70 लाख कुटुंबांची संख्या 30 लाखांनी कमी करणार 5. जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर ठेवण्यासाठी अनुदानात वाढ 6. राज्याचे दरडोई उत्पन्न दुपटीने वाढवणार7. 16 टक्के सिंचन क्षमता 22 टक्क्यांपर्यंत वाढवणे8. 2012 पर्यंत राज्य लोडशेडिंगमुक्त करणार9. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवणे10. 12 जिल्ह्यांनासुद्धा चौपदरी रस्त्यांनी जोडणार11. एमएमआरडीएची 1 लाख 13 हजार कोटी रुपयांची कामे पूर्ण करणार38 विभागानी मिळून हा व्हिजन डॉक्युमेंटचा आराखडा तयार केला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 17, 2010 10:13 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 17, 2010 10:13 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close