S M L

कोकणी सिनेमाची 'ऑस्कर'वारी, 'नाचोम या कुंपासर' नामांकित

Sachin Salve | Updated On: Dec 16, 2015 05:15 PM IST

कोकणी सिनेमाची 'ऑस्कर'वारी, 'नाचोम या कुंपासर' नामांकित

16 डिसेंबर : 'नाचोम या कुंपासर' हा कोकणी सिनेमा यंदाच्या ऑस्कर अवॉर्ड्ससाठी सर्वोत्कृष्ट परदेशी सिनेमांच्या कॅटेगरीत नॉमिनेट झालाय. कोकणी भाषेचा आणि सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेल्याने या सिनेमाचे दिग्दर्शक बर्डरॉय बरेटो यांनी समाधान व्यक्त केलंय.

भारताकडून ऑस्करसाठी चैतन्य ताम्हाणे दिग्दर्शित 'कोर्ट' या मराठी सिनेमाला अधिकृतरित्या ऑस्कर अवॉर्ड्ससाठी पाठवण्यात आलं होतं.मात्र, 'नाचोम या कुंपासर' आणि 'प्रकाश बाबा आमटे' या दोन सिनेमांनी स्वतंत्रपणे ऑस्कर पुरस्कारांमध्ये एंट्री दाखल केली होती. हा सिनेमा जगभरातून ऑस्करसाठी पाठवण्यात आलेल्या 309 सिनेमांमध्ये निवडला गेलाय. यानंतर जगभरातील 6000 निमंत्रकांसमोर या सिनेमाचं स्क्रिनिंग करण्यात येईल. त्यांची पसंती मिळाली तर हा सिनेमा सर्वोत्कृष्ट परदेशी सिनेमांच्या अंतिम सहा सिनेमांच्या यादीत स्थान मिळवण्यात यशस्वी होईल. या सिनेमाला यंदा सर्वोत्कृष्ट कोकणी सिनेमासह दोन राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 16, 2015 05:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close