S M L

...तर 'लोकल'करांना करता येईल एक्स्प्रेसने सुसाट प्रवास

Sachin Salve | Updated On: Dec 16, 2015 07:08 PM IST

...तर 'लोकल'करांना करता येईल एक्स्प्रेसने सुसाट प्रवास

16 डिसेंबर : मुंबई लोकल ट्रेनमध्ये वाढत्या गर्दीमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी गर्दीच्या काळात लोकल प्रवाशांना लांब पल्ल्याच्या गाड्यांमधून प्रवास करण्याची परवानगी देण्याचा रेल्वे प्रशासनाचा विचार आहे.

रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष समितीनं हा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयासमोर ठेवलाय. मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रस्तावावर सकारात्मक विचार करतंय अशी माहिती रेल्वे मंत्रालयाचे वकील सुरेश कुमार यांनी डिव्हीजनल बेंच समोर दिली. त्यामुळे आता लवकरच लोकल प्रवाशांना गर्दीच्या वेळेत लांब पल्याच्या गाड्यांनीही प्रवास करता येणार आहे. सध्या लांब पल्ल्याच्या गाड्याने लोकलच्या तिकिटांवर प्रवास करण्यास मनाई आहे. जर तुम्हाला लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेसने प्रवास करायचा असेल तर त्यासाठी एक्स्प्रेसचं तिकीट काढावं लागतं. तसंच जर एक्स्प्रेसवर लोकलच्या प्रवाशांनी गर्दी केली तर साहजिकच एक्स्प्रेसवर याचा ताण पडेल. कारण, दादरवरून सुटणारी एक्स्प्रेस एकतर ठाणे किंवा थेट कल्याण स्टेशनवर थांबते. त्यामुळे कल्याण आणि ठाण्याला राहणार्‍या प्रवाशांना याचा फायदा होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 16, 2015 07:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close