S M L

एसटीचा 'चक्का जाम', कर्मचार्‍यांनी पुकारला संप

Sachin Salve | Updated On: Dec 17, 2015 09:17 AM IST

एसटीचा 'चक्का जाम', कर्मचार्‍यांनी पुकारला संप

17 डिसेंबर : पगारवाढीसाठी एसटी कामगारांच्या इंटक या संघटनेनं आज राज्यव्यापी संप पुकारला आहे. राज्यभरातले एसटी कामगार या संपात सहभागी झाले आहे. परिणामी ग्रामीण भागातील एसटीगाड्यांच्या अनेक फेर्‍या ऐनवेळी रद्द कराव्या लागल्यात. या संपामुळे शालेय विद्यार्थी तसंच प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील चार कर्मचार्‍यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याने एसटी वर्कर्स काँग्रेसने संपाची हाक दिलीय. एसटी कर्मचार्‍यांना 25 टक्के पगारवाढ मिळावी या मागणीसाठी हा संप पुकारण्यात आल्याचं संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आलंय.

एसटी कर्मचार्‍यांचे पगार इतर महामंडळातील कर्मचार्‍यांपेक्षा कमी आहेत. त्यामुळे एसटी कामगार देशोधडीला लागला असल्याचा आरोप एसटी वर्कर्स काँग्रेसने केलाय. मान्यताप्राप्त कामगार संघटना सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारसी लागू करण्याचा दावा करत असली तरिही परिस्थिती वेगळी आहे.

त्यामुळे आजपासून राज्यभरातील सर्व एसटी कर्मचारी एक दिवसाच्या लाक्षणिक संपावर जात असल्याचं संघटनेने जाहीर केलंय. याचा फटका महाराष्ट्रातील सर्वच प्रमुख आगारांमधील एसटी सेवेला बसणार असल्याने सर्वसामान्य प्रवाशांना त्याचा फटका बसेल.

विशेष करून कोकण मराठवाडा विदर्भ येथील खेडोपाडी रहाणार्‍या आणि फक्त एसटीवर अवलंबून असणार्‍या जनतला या संपाचा त्रास सहन करावा लागतोय.

सिंधुदुर्ग रत्नागिरीत जिल्ह्यात शालेय विद्यार्थ्यांचे तसंच प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. तर मराठवाड्यातही बीड आणि उस्मानाबाद एसटी कामगार संपाला चांगला प्रतिसाद मिळाल्याने सामान्य प्रवाशांचे हाल होत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 17, 2015 09:17 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close