S M L

पालिकेच्या टॅब योजनेत घोळ, विद्यार्थ्यांना वाटले स्वस्तातले टॅब !

Sachin Salve | Updated On: Dec 17, 2015 10:05 AM IST

sena tab17 डिसेंबर : शिवसेनेचे युवराज आदित्य ठाकरे यांनी पुढाकार घेत मुंबई महानगर पालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना टॅब देण्याचा निर्णय घेतला खरा पण या योजनेला घोटाळ्याचा 'व्हॉयरस' लागलाय की काय अशी शंका उपस्थित झालीये. कारण विद्यार्थ्यांना देण्यात आलेले टॅब वेगवेगळ्या कंपनीचे असल्याचं समोर आलंय. काही विद्यार्थ्यांना व्हिडिओकॉनचे टॅब दिले गेले तर काहींना स्वस्त कंपनीचे टॅब मिळाले आहे.

विद्यार्थ्यांच्या दप्तराचं ओझं कमी करण्यासाठी टॅब वाटप करा अशी सुचना आदित्य ठाकरेंनी केली होती. उद्धव ठाकरेंनी ही दुरदृष्टी दाखवत महानगर पालिकेत टॅबचा प्रस्ताव मंजूर करत बीएमसी शाळेतल्या विद्यार्थ्यांना टॅब वाटला सुद्धा. त्यावेळी वाटप करण्यात येणारा टॅब हा व्हिडिओकॉन कंपनीचा होता. पण आता इतर नगरसेवकांच्या वॉर्डमध्ये वाटले जाणारे टॅब हे वेगळ्याचं कंपनीचे आहेत. कुर्ल्यामधल्या शाळांमध्ये बोल्ड कंपनीचे टॅब वाटले जात आहेत. टेक्नो इलेक्ट्रानिक्स नावाच्या कंपनीचे हे टॅब पालिकेच्या प्रस्तावात संमत झाले नव्हते. मग विद्यार्थ्यांना वाटण्यात आले कसे असा सवाल या भागातल्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका सईदा खान विचारत आहेत.

 टॅबचा घोळ

पालिकेनं प्रत्येक वर्षी 23 हजार असा दोन वर्षाचा कंत्राट व्हिडीओकॉन कंपनीला दिला होता

त्यापैकी पहिल्या वर्षीचे 21 हजार टॅबचं वाटप झाल्याची माहिती मिळतेय

एल वॉर्ड मधल्या शाळांमध्ये bolld नावाच्या कंपनीचे टॅप वाटले गेले

या टॅबची बॅटरी ही फक्त दोन तास चालते म्हणून हे टॅब शाळेतच ठेवले जातात

व्हिडिओकॉनच्या टॅबची किंमत सुमारे 6,900 हजार होती

ज्यात डिजीटल पुस्तकांचा समावेश होता

या बोल्ड कंपनीच्या टॅबची किंमत 4,809 रुपये आहे

बोल्ड कंपनीच्या टॅबवर व्हिडिओकॉनचा लोगो सुद्धा नाही

मग प्रत्येक टॅबच्या मागचे 2000 हजार गेले कुठे ?

 

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 17, 2015 10:05 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close