S M L

धक्कादायक, अख्खं कुटुंब 9 महिन्यांपासून बेपत्ता !

Sachin Salve | Updated On: Dec 17, 2015 12:01 PM IST

धक्कादायक, अख्खं कुटुंब 9 महिन्यांपासून बेपत्ता !

 17 डिसेंबर : आजवर आपण एखादी व्यक्ती बेपत्ता झाल्याची बातमी नक्कीच ऐकली असेल...नालासोपार्‍यात मात्र, अख्खं कुटुंबंच गेल्या 9 महिन्यांपासून बेपत्ता आहे. नालासोपार्‍यात एक व्यक्ती नाही तर 10 महिन्यांच्या एका चिमुकलीसह सहा माणसांचं एक कुटुंब नऊ महिन्यापासून बेपत्ता आहे. याची तक्रार नालासोपारा तुळींज पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. अचानक संपूर्ण कुटुंब कसं काय गायब होऊ शकतं? या घटनेने नालासोपारा पोलिसांची झोप उडाली आहे.

ही घटना आहे नालासोपारा पूर्व नालेश्वरनगर येथील, येथून एक संपूर्ण कुटुंबच मागील नऊ महिन्यापासून बेपत्ता झाले आहे. मागील नऊ महिन्यापासून कोणताही संपर्क होत नसल्यामुळे हे कुटुंब कुठे गेले असेल, अचानक का बेपत्ता झाले, का त्यांच्या सोबत काही घातपात झाला असेल या भितीने त्यांचे नातेवाईक चिंताग्रस्त झाले आहेत.

रामदास इगवे (वय 55), मंगलबाई इगवे (वय 42), भाविन रामदास इगवे (वय 25), आशा भाविन इगवे (वय 20), त्यांची एक दहा महिन्याची मुलगी, सचिन रामदास इगवे (वय 24), त्याची पत्नी उज्वला सचिन इगवे (वय 21) असं सात माणसांचे कुटुंब मागील नऊ महिन्यांपासून बेपत्ता झाले आहे. नालासोपारा पूर्व नालेश्वरनगर येथील वैष्णवी सदन या इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावर एका रुममध्ये हे कुटुंब राहत होतं.

आशा इगवे ही प्रस्तुती झाल्यानंतर अवघ्या एक महिन्यांत तीच्या सासरच्या मंडळीने तीला घेवून गेले होते. आशाला घेऊन गेल्याच्या नंतर आठ दिवसाच्या नंतर तीच्या आई वडिलांनी घरी जावून चौकशी केली तर संपूर्ण इगवे कुटुंबच घरी नसल्याची त्यांना माहिती मिळाली. पण ते कुठे गेले याची त्यांच्या शेजार्‍यांना सुद्धा कल्पना नसल्यामुळे सर्वच जण चिंतेत आहेत. आशाची आई राजश्री प्रभाकर घरावत हीने त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांचा कोणताही फ़ोन लागत नव्हता. त्यांनी गुजरात, मुंबई, हैद्राबाद या ठिकाणी असणार्‍या नातेवाईकांकडे सर्वत्र चौकशी केली. परंतु कुठेच तपास लागत नसल्यामुळे भरावत कुटुंबिय चिंताग्रस्त झाले.

शेवटी 8 डिसेंबर रोजी त्यांनी संपूर्ण कुटुंबच बेपत्ता झाले असल्याची तक्रार नालासोपारा येथील तुळींज पोलीस ठाण्यात दिली आहे. पण फ़क्त पोलिसांनी तक्रार घेतली आहे. त्याचा पुढे काहीच तपास झाला नसल्याचा आरोपही त्यांच्या नातेवाईकांकडून होत आहे. लवकरात

लवकर तपास व्हावा अशी विनंती बेपत्ता कुटुंबियांच्या नातेवाईकांकडून होत आहे.

मागील नऊ महिन्यांपासून इगवे कुटुंब बेपत्ता असल्यामुळे स्थानिक रहिवाशात सुद्धा घबराट पसरली आहे. इगवे कुटुंबियांचा ज्योतीष पाहण्याचा व्यवसाय होता. कदाचित त्यांच्या व्यवसायासाठी आपले कुटुंब घेवुन स्थलांतरीत झाले असावे असा अंदाज पोलीस बांधत आहेत. तसंच त्यांचे शेवटचे लोकेशनही पोलिसांना मिळत नसल्यामुळे तपासात अडचणी येत असल्याचं पोलिसांनकडून सांगण्यात येत आहे.

बेपत्ता झालेल्यांची नावं

रामदास इगवे, वय 55

मंगलबाई इगवे, वय 42

भाविन रामदास इगवे, वय 25

आशा भाविन इगवे वय 20

आशा इगवे यांची 10 महिन्यांची मुलगी

सचिन रामदास इगवे, वय 24

उज्वला सचिन इगवे वय 21

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 17, 2015 12:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close