S M L

'खिलाडी' vs 'तलाईवा', अक्षयकुमार 'रोबोट टू' मध्ये खलनायक

Sachin Salve | Updated On: Dec 17, 2015 12:31 PM IST

'खिलाडी' vs 'तलाईवा', अक्षयकुमार 'रोबोट टू' मध्ये खलनायक

17 डिसेंबर : खिलाडी अक्षय कुमार लवकरच रजनीकांतसोबत 'रोबोट टू' या सिनेमात काम करताना दिसणार आहे. खुद्द अक्षयनेच त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून ही माहिती दिलीय. अक्षयकुमार या सिनेमात खलनायकाची भूमिका साकारणार असल्याचं समजतंय.

नुकतंच अक्षयने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर एक फोटो शेअर केलाय. यात सुपरस्टार रजनीकांत, अक्षय कुमार, रोबोटचा दिग्दर्शक एस शंकर आणि संगीतकार ए.आर. रेहमान हे एकत्र दिसतायत. 2015 चा शेवट याहून छान होऊच शकत नाही असं अक्षयने या फोटोसोबत लिहिलंय. आता अक्षय आणि रजनी सोबत काम करणार म्हंटल्यावर रोबोट टू मध्ये जबरदस्त ऍक्शन पहायला मिळणार हे काही वेगळं सांगायला नको...अक्षय या सिनेमात नक्की कोणती भूमिका करतोय ते अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र या दोघांना स्क्रिनवर एकत्र पहाणं हे या दोघांच्या फॅन्ससाठीही मोठी पर्वणी ठरेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 17, 2015 10:23 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close