S M L

मुंबई मेट्रोची भाडेवाढ आणखी महिनाभरासाठी टळली

Samruddha Bhambure | Updated On: Dec 17, 2015 09:53 PM IST

mumbia-metro1111

17 डिसेंबर : मुंबई हायकोर्टाने मुंबईकरांना तात्पुरता दिलासा दिला आहे. मुंबई मेट्रोची भाडेवाढ तूर्तास पुढे ढकली. एमएमआरडीएच्या याचिकेवर सुनावणी होईपर्यंत मेट्रोची दरवाढ करण्यास हायकोर्टाने मनाई केली आहे. त्यामुळे मेट्रोच्या प्रवाशांना आणखी महिनाभरासाठी का होईना पण दिलासा मिळाला आहे. याप्रकरणाची सुनावणी आता 29 जानेवारीला होणार आहे. त्याआधी मेट्रोने कोणतीही दरवाढ करु नये असे स्पष्ट आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत.

मेट्रो प्रशासनाकडून 27 नोव्हेंबर रोजी तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. यात मेट्रोच्या प्रवासी भाडय़ात पाच रुपयांची तर मासिक पासात देखील 50 रुपयांची वाढ करण्यात येणार होती. ही भाडेवाढ 1 डिसेंबरपासून लागू करण्याचा निर्णय मेट्रोने घेतला होता. मात्र, या निर्णयाला उच्च न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली होती.

मेट्रो तिकीट दर निश्चिती समितीने केलेल्या शिफारसींनुसार मेट्रोला तिकीट दरांमध्ये 10 ते 110 रुपयांपर्यंत दरवाढ करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, एमएमआरडीएने त्यावर आक्षेप घेत हायकोर्टात धाव घेतली होती. त्यामुळे जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत तरी मेट्रोचे दर 'जैसे थे'च राहणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 17, 2015 04:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close