S M L

आता आमची सटकली, शनी शिंगणापूरच्या विश्वस्तपदाकडे रणरागिणींची झेप

Sachin Salve | Updated On: Dec 18, 2015 10:10 AM IST

आता आमची सटकली, शनी शिंगणापूरच्या विश्वस्तपदाकडे रणरागिणींची झेप

18 डिसेंबर : शनी शिंगणापूरच्या चौथर्‍यावर चढून शणीदेवाचे दर्शन घेतल्यामुळे एकच वाद पेटला होता. एवढंच काय तर महिलेनं स्पर्श केला म्हणून शणीदेवाचा दुधाने अभिषेक केला होता. आता या प्रकरणाचा दुसरा आध्याय सुरू झाला असून रणरागिणींनी शनी शिंग्णापूरच्या विश्वस्त मंडळावर विश्वस्तपदासाठी मोर्चेबांधणी सुरू केलीये. जर एखादी महिला खरंच विश्वस्त झाली तर ही घटना ऐतिहासिक ठरणार आहे.

गेली कित्येक दशक शनी शिगणापूरमध्ये महिलांनी प्रवेश करू नये अशी प्रथा आहे. पण, या प्रथेला छेद देत एका तरुणीने थेट चौथर्‍यावर चढून दर्शन घेतलं. पुरोगामी म्हणवणार्‍या या महाराष्ट्रात याचे पडसाद काही वेगळेच उमटले. त्यामुळे महिलांमध्ये कमालीची नाराजी पसरली. आता या रणरागिणींनी अशा प्रथांना कायमचा धडा शिकवण्यासाठी हल्लाबोल केला. कारण शनी शिंग्णापूरच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला विश्वस्त पहायला मिळणार आहे.

ज्या शनीच्या चौथर्‍यावर महिलांना प्रवेश नव्हता. त्याच शनीच्या विश्वस्तपदाची सूत्र आता महिलेच्या हाती जाणार आहे. शिंग्णापूरच्या चार ते पाच महिलांनी विश्वस्तपदासाठी मोर्चेबांधणी सुरू केलीय. कागदपत्रांची त्यांनी जुळवाजुळव केली आहे. शनी शिंग्णापूरला महिला सुरक्षा आहे. महिला पोलीस आहेत मग महिला विश्वस्त का नको ? असा सवालच या रणरागिणींनी उपस्थित केलाय. त्याचबरोबर विश्वस्त पदासाठी त्यांनी आरक्षणाचीही मागणी केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 18, 2015 09:35 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close