S M L

नाशिक : कारला भीषण अपघातात 5 जण जागीच ठार

Sachin Salve | Updated On: Dec 19, 2015 01:50 PM IST

नाशिक : कारला भीषण अपघातात 5 जण जागीच ठार

19 डिसेंबर : नाशिक वणी-कळवण मार्गावर शुक्रवारी रात्री 2च्या सुमारास कार झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात 5 जण जागीच ठार तर 3 जण गंभीर जखमी झाले आहे. वणी-कळवण मार्गावर खांडेमळा गावाजवळ हा अपघात झालाय.

भरधाव वेगाने जाणार्‍या या कारच्या चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडाला कारने धडक दिल्याने हा अपघात झाला. ही धडक इतकी भीषण होती की कारचा अक्षरश : चुराडा झाला.

हे सर्व वणी गावातील रहिवासी आहेत. यात साहिल सय्यद, शकिल सय्यद, सचिन डोले, सनी गांगुर्डे आणि चालक साहिल झावरे हे 5 जण जागीच ठार झालेत. इम्रान शेख, रोशन खडाम, ज्ञानेश्वर धूम हे 3 जण जखमी झाले आहे. सर्व जखमींवर वणी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताची नोंद वणी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 19, 2015 12:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close